9960589000         कार्यालयीन वेळ : सोम. ते शुक्र. स. ९.०० वा ते संध्या ६.०० वा.

 

ग्रामपंचायत नांद्रे

ता. मिरज जि. सांगली

उपलब्ध लोकसेवा (Available Services) अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

जन्म नोंदणी व प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत जन्म झाला असल्यास २१ दिवसांच्या आत जन्म नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे:

1) अर्ज
2) आई-वडील यांचे आधारकार्ड
3) आशा/अंगणवाडी कार्यकर्ती यांचा अहवाल
4) आवश्यकतेनुसार रुग्णालय कागदपत्रे

प्रक्रिया :

जन्म गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र येथे झालेल्या जन्माची नोंदणी त्याच ठिकाणी केली जाते.

शुल्क: पहिले प्रमाणपत्र मोफत त्यानंतर 20 रुपये
वेळ: 7 दिवस

मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र

गावाच्या हद्दीत मृत्यू झाला असल्यास २१ दिवसांच्या आत मृत्यू नोंदणी केली जाते व प्रमाणपत्र दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे:

1) अर्ज
2) मयत व्यक्तीचे आधारकार्ड
3) आवश्यकतेनुसार रुग्णालय/पोलीस स्टेशन कागदपत्रे

प्रक्रिया :

मृत्यू गावाच्या हद्दीत झाला असल्याची खात्री झाल्यावर नोंदणी केली जाते.

शुल्क: पहिले प्रमाणपत्र मोफत त्यानंतर 20 रुपये
वेळ: 7 दिवस

विवाह नोंदणी व प्रमाणपत्र

विवाह नोंदणी अधिनियम 1998 नुसार विवाह नोंदणी केली जाते.

आवश्यक कागदपत्रे:

1) विवाहाचे ज्ञापन
2) वर-वधूचे जन्म प्रमाणपत्र
3) शाळा सोडल्याचा दाखला
4) आधार/मतदार कार्ड/ड्रायविंग लायसन्स
5) रेशन कार्ड/वीजबिल/पासपोर्ट
6) लग्नपत्रिका
7) शपथपत्र
8) लग्नाचे फोटोग्राफ्स
9) पासपोर्ट फोटो (2)
10) तीन साक्षीदार फोटो (2)
11) घटस्फोट आदेश प्रत
12) पूर्वीच्या जोडीदाराचे मृत्यू प्रमाणपत्र

प्रक्रिया :

प्राप्त अर्ज व कागदपत्रे यांची छाननी केली जाते. खात्री झाल्यावर विवाह नोंदणी केली जाते.

शुल्क: विवाह नोंदणी शुल्क 50 ते 200 रुपये, प्रमाणपत्र शुल्क 20 रुपये
वेळ: —

दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला

दारिद्र्य रेषेखालील असलेल्या यादीत नाव असल्यास दाखला दिला जातो.

आवश्यक कागदपत्रे:

1) अर्ज

प्रक्रिया :

यादीत नाव तपासून दाखला दिला जातो.

शुल्क: 20 रुपये
वेळ: 7 दिवस

नमुना नं 8 चा उतारा

नमुना नंबर 8 मधील स्वमालकीच्या मालमत्तेचा उतारा दिला जातो.

आवश्यक कागदपत्रे:

1) अर्ज

प्रक्रिया :

नमुना नं 8 रजिस्टरवरून नाव तपासून उतारा दिला जातो.

शुल्क: 20 रुपये
वेळ: 5 दिवस

थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र

ग्रामपंचायत करांची येणे बाकी नसल्यास प्रमाणपत्र दिले जाते.

आवश्यक कागदपत्रे:

1) अर्ज

प्रक्रिया :

नमुना नं 9 रजिस्टरवरून नाव तपासून प्रमाणपत्र दिले जाते.

शुल्क: 20 रुपये
वेळ: —

निराधार असल्याचा दाखला

कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटुंब प्रमुख नसल्याचा दाखला दिला जातो.

आवश्यक कागदपत्रे:
1) अर्ज
2) कुटुंब प्रमुख मृत्यू प्रमाणपत्र

प्रक्रिया :
चौकशी व खात्री करून प्रमाणपत्र दिले जाते.

शुल्क: निःशुल्क
वेळ: 20 दिवस

B2C (Business to Citizen) सेवा अंतर्गत विविध प्रकारचे दाखले दिले जातात. शासनाकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये प्रामुख्याने खालील दाखले येतात

1. रहिवासी दाखला
2. उत्पन्न दाखला
3. जात प्रमाणपत्र
4. वय / जन्म दाखला
5. मृत्यू दाखला
6. राष्ट्रीयत्व दाखला
7. अधिवास (Domicile) दाखला
8. ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
9. अल्पभूधारक प्रमाणपत्र
10. नॉन-क्रीमी लेयर प्रमाणपत्र
11. विवाह नोंदणी प्रमाणपत्र
12. वारस प्रमाणपत्र
13. कृषक प्रमाणपत्र
14. बेघर / दारिद्र्य प्रमाणपत्र
15. विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक प्रमाणपत्रे

C2C (Citizen to Citizen) सेवा ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या स्थानिक सेवांमध्ये:

1. जन्म दाखला
2. मृत्यू दाखला
3. विवाह नोंद उतारा
4. घरपट्टी थकबाकी नसल्याचा दाखला
5. पाणीपट्टी थकबाकी नसल्याचा दाखला
6. मालमत्ता उतारा
7. घर क्रमांक प्रमाणपत्र
8. कुटुंब नोंद उतारा
9. रहिवासी दाखला
10. चारित्र्य प्रमाणपत्र (स्थानिक शिफारस)
11. व्यवसाय परवाना संबंधी दाखले
12. बांधकाम परवानगी संबंधित दाखले

अर्ज प्रक्रिया

1

अर्ज सादर करा

विहीत नमुन्यात ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज सादर करा.

2

अर्ज व कागदपत्रे पडताळणी

ग्रामपंचायत कार्यालयात प्राप्त अर्ज व कागदपत्रे यांची पडताळणी होईल.

3

प्रमाणपत्र वितरण

पात्र अर्जदारास विहीत कालमर्यादेत प्रमाणपत्र दिले जाईल.

अर्ज नमुना डाउनलोड करा

जन्म मृत्यु अनुपलब्धता अर्ज

Download

लोकसेवा अर्ज

Download

विवाह नोंदणी अर्ज

Download